शेंद्रा ते ढोरेगाव ७० किमी सहापदरी महामार्गासाठी २,३०० कोटींची निविदा

Foto
सांजवार्ता
Page No.: 8
Date: 28/11/2026
शेंद्रा ते ढोरेगाव ७० किमी सहापदरी महामार्गासाठी २,३०० कोटींची निविदा
फेब्रुवारी २०२७ पासून प्रत्यक्ष कामाला होणार सुरुवात
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शहराच्या औद्योगिक विकासाला आणि दळणवळणाला गती देणाऱ्या शेंद्रा डीएमआयसी-बिडकीन ते ढोरेगाव या ७०.६० किलोमीटरच्या सहापदरी सिमेंट काँक्रीट ग्रीनफील्ड महामार्गाचा मार्ग मोकळा झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारी (दि.२६) या प्रकल्पासाठी २ हजार ३०० कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली असून, फेब्रुवारी २०२७ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
हा महामार्ग दोन स्वतंत्र टप्प्यांत उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शेंद्रा डीएमआयसी ते बिडकीन हा ३५.८० किमीचा मार्ग १ हजार १०० कोटी रुपये खर्चुन विकसित केला जाईल. दुसऱ्या टप्प्यात बिडकीन एमआयडीसी ते ढोरेगाव (पुणे-नगर रस्ता) हा ३४.८० किमीचा मार्ग १ हजार २०० कोटी रुपयांत उभारला जाईल. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक आणि न्यू
डेव्हलपमेंट बँक यांच्या अर्थसाह्यातून हा निधी उपलब्ध होणार आहे. जमीन सपाटीकरणाची कामे सुरू होऊन जून-जुलैपासून प्रत्यक्ष काँक्रीटीकरणाला वेग येईल. २४ महिन्यांत काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदाराला विशेष बोनसही दिला जाणार आहे. महामार्गासाठी जमिनीचे मोजमाप पूर्ण झाले असून, भूसंपादनासाठी शासनाने ७४५
दोन टप्प्यांत कामाला सुरुवात
निविदा सादर करण्याची अंतिम मुदत १७ डिसेंबर असून, २१ डिसेंबरला निविदा उघडल्या जातील. फेब्रुवारी २०२७ मध्ये लेव्हलिंग व शेंद्रा बिडकीन ते ढोरेगाव महामार्गासाठी दोन निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. पुढील महिन्यात प्रक्रिया पूर्ण होऊन फेब्रुवारी २०२७ पासून दोन टप्प्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
एस. एस. भगत, अधीक्षक अभियंता, सार्वजिनक
बांधकाम विभाग
कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातील ३१५ कोटी पहिल्या टप्प्यासाठी, तर ४३० कोटी दुसऱ्या टप्प्यासाठी दिले जातील. १ डिसेंबरनंतर अंतिम अधिसूचना निघून भूसंपादन सुरू होईल.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions